

आमच्या विषयी
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन १९८६ पासून कार्यरत असून आज त्याचे कार्यक्षेत्र ५ जिल्ह्यात पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूपासून ते तळ कोकणातील देवगड, सावंतवाडी इथपर्यंत सुमारे ७०० कि.मी. पसरलेल्या २६ सहकारी बँका असोसिएशनच्या सभासद आहेत. त्यात ७ शेडूल्ड / मल्टीस्टेट दर्जाच्या बँका आहेत. असोसिएशन कर्मचार्यांसाठी तसेच संचालक मंडळ, सदस्य बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण यांसारखे विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करते. असोसिएशन बँक संचालकांसाठी अभ्यास दौरे, बँकिंग संबंधित कार्यशाळा, बँक कर्मचारी, कार्यकारी अधिकारी इत्यादींसाठी विविध सेमिनार आयोजित करते. सभासद बँक कर्मचाऱ्याच्या कला / क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी असोसिएशन वेळोवेळी क्रीडा आणि सांस्कृतिक विभागीय स्पर्धा जिल्हावार आयोजित करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असोसिएशनचा मुख्य जोर सभासद बँकांना बँकिंग संबंधित बाबींवर आवश्यक सहाय्य आणि मार्गदर्शन प्रदान करणे हा आहे. अशा रीतीने कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन सभासद बँक व रिझर्व बँक यांना जोडणारा दुवा आहे. तसेच, सहकार खात्याशी संबधित बाबीसाठीही सभासद बँकांना असोसिएशन मदत करते.
