कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि.तर्फे सर्व सभासद बँकाकरिता “राज्य सहकारी कायद्याखाली वार्षिक सभा आयोजनाबाबत महत्वाच्या बाबी” या विषयावर गुरुवार दि. २५.०८.२०२२ रोजी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, बोर्ड विभागातील अधिकारी / कर्मचारी तसेच वार्षिक सभेच्या आयोजनाची जबाबदारी असलेले अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता आयोजित करण्यात आले होते.
असोसिएशनच्या २६ सभासद बँकांपैकी १२ सभासद बँकांचे मिळून एकूण ४१ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षण वर्गात वार्षिक सभेची तयारी, वार्षिक सभेतील कामकाज, काही विशेष पद्धती / उपक्रम विचार कराव्या अश्या व वार्षिक सभेनंतरच्या करावयाच्या पुर्तातांची माहिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. बँकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.