कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. तर्फे सर्व सभासद बँकाकरिता “Banking Regulation Act (Important Provisions) applicable to UCBs” या विषयावर मंगळवार दि. २४.०१.२०२३ रोजी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, बोर्ड सेक्रेटरी, कम्पलायन्स विभागाचे प्रमुख व मा. संचालक यांचेकरिता आयोजित करण्यात आले होते.
असोसिएशनच्या २६ सभासद बँकांपैकी १६ सभासद बँकांचे मिळून एकूण ६१ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षण वर्गात Banking Regulation Act मधील नागरी सहकारी बँकांना लागू झालेल्या महत्वाच्या तरतुदी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गास श्री. सुनील साठे (MD & CEO, TJSB) व अॅड. मेघना आंबेकर (संचालिका, डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.) यांनी मार्गदर्शन केले.
बँकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.