
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. तर्फे सर्व सभासद बँकाकरिता विविध कायद्यांतर्गत कर्ज वसुली या विषयावर शनिवार दि. ३०.०४.२०२२ रोजी एका एकदिवशीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली व लिगल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचेकरिता आयोजित करण्यात आली होती.
असोसिएशनच्या २६ सभासद बँकांपैकी १३ सभासद बँकांचे मिळून एकूण ४६ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सदर कार्यशाळेत सहकार कायद्यांतर्गत वसुली या विषयावर श्री. पंकज बिरवडकर (वसुली अधिकारी, ठाणे भारत सहकारी बँक लि.), सरफेसी कायद्यांतर्गत कर्ज वसुली या विषयावर श्री. भालचंद्र भोळे (वसुली अधिकारी, डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.) व Insolvency & Bankruptcy (IBC) या विषयावर सी.ए. अजय मराठे यांनी मार्गदर्शन केले.
