
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. तर्फे सर्व सभासद बँकाकरिता “रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन” या विषयावर बुधवार दि. २२.०६.२०२२ रोजी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑडिट विभागातील प्रमुख तसेच रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन दरम्यान उपस्थित असणारे अधिकारी यांचेकरिता आयोजित करण्यात आले होते.
असोसिएशनच्या २६ सभासद बँकांपैकी १२ सभासद बँकांचे मिळून एकूण ४४ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षण वर्गात रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन साठीची पूर्वतयारी, रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शनदरम्यान घ्यावयाची काळजी (Points related toInteraction with the RBI Inspection Team), पूर्तता अहवाल (Compliance Report) तयार करणे व सादर करणे व RBI Showcause Notices ला प्रतिसाद देणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच शंका निरसन सत्रात उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. बँकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.