
ठाणे भारत सहकारी बँकेच्या दादर (प.), मुंबई शाखेचे नवीन जागेत सोमवार, दि. २८ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता स्थलांतराचे औपचारिक उदघाटन बँकेचे अध्यक्ष मा. श्री. अुत्तम भास्कर जोशी साहेब यांचे शुभहस्ते व ATM चे उदघाटन बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. मिलिंद माधव गोखले साहेब यांचे शुभहस्ते झाले. सदर शाखा सी.के.पी. सभागृह, तळमजला, शिवाजी पार्क पोलिस स्टेशनच्या बाजूला, राम मारुती रोड, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८ येथे आहे.
या प्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष मा. श्री. अुत्तम जोशी यांनी उपस्थित ग्राहकांना व हितचिंतकांना बँकेत जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्यात तसेच कर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड करावी असे आवाहन केले. बँकेच्या ग्राहकांना सोयीचे होईल अशा ठिकाणी हि जागा घेतली आहे तेव्हा बँकेच्या ग्राहकांनी व या परिसरातील नागरिकांनी बँकेत नवीन खाती उघडून बँकेबरोबर बँकिग व्यवहार करण्याचे आवाहन केले.
तसेच बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. मिलिंद माधव गोखले साहेब यांनी सांगितले की, ग्राहकांनी व नागरिकांनी ATM सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

आजमितीस बँकेच्या ३० शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असून बँक ही सेवा देणारी संस्था आहे. त्यामुळे, आम्हाला बँकेच्या ग्राहकांना कशाप्रकारे चांगली सेवा देता येईल त्यास बँक प्राधान्य देत आहे. आपली बँक अद्यावत तंत्रज्ञानाने सज्ज आहे. त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना सेवेचा लाभ होणार आहे. आज रोजी बँकेचा एकूण व्यवहार रु. २,१०० कोटी इतका आहे.
सदर समारंभास बँकेचे अध्यक्ष मा. श्री. अुत्तम भास्कर जोशी, उपाध्यक्ष मा. श्री. मिलिंद माधव गोखले साहेब बँकेचे इतर संचालक सदस्य, बँकेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री. सतीशचंद्र हर्डीकर, श्री. सुबोध कापडेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (हंगामी) श्री. प्रसाद दांडेकर, बँकेचे विशेष सल्लागार श्री. शेखर देसाई तसेच शाखाधिकारी सौ. अनुजा पाटणकर व अधिकारी वर्ग आणि दादर शाखेचे ग्राहक, भागधारक, नागरिक, हितचिंतक उपस्थित होते.