एकदिवसीय सहकार परिषद संपन्न : कोकणातील बँकांचा सहभाग

कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने सहकार भारती, कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १६ जानेवारी २०२१ रोजी एका एकदिवशीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सहकार परिषदेचे प्रायोजकत्व अंबरनाथ जयहिंद को. ऑप. बँकेने स्विकारले होते.

सहकार परिषद सर्व सभासद बँकांचे मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष, मा. संचालक तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकरिता आयोजित करण्यात आली होती. असोसिएशनच्या २७ बँकांपैकी १८ बँकांचे मिळूण एकूण ४८ प्रतिनिधी सहकार परिषदेस उपस्थित होते. याव्यतिरिक्त इतर निमंत्रित देखील परिषदेस उपस्थित होते.

सदर सहकार परिषदेस मा. श्री. सतिशजी मराठे (संचालक, RBI), मा. श्री. आशिषकुमार चौहान (MD & CEO of BSE) तसेच, मा. श्री. के. के. त्रिपाठी (संचालक, VAMNICOM) यांचे मार्गदर्शन लाभले. उपस्थितांना मा. श्री. आशिषकुमार चौहान यांनी Preparing to raise Capital through public issue व मा. श्री. के. के. त्रिपाठी यांनी Governance for Co.op. या विषयांवरती मार्गदर्शन केले. तसेच, शंका निरसन सत्रात उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. बँकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे सहकार परिषद यशस्वीपणे पार पडली.

Share this Story