“सार्थ कोकण” च्या जागृतीपर विशेषांक संकल्पनेची केली विशेष प्रशंसा !!

पुणे: “सहकारी बँकांना व्यावसायिक यश प्राप्त व्हावे या दृष्टीने त्यांच्या जिल्हा व विभागीय असोसिएशन्सनी पुढाकार घ्यावा” अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे साहेब यांनी व्यक्त केली. कोकण नागरी सहकारी बँकस् असोसिएशनचे मुखपत्र सार्थ कोकणच्या  कर्ज वसूली विशेषांकाचे प्रकाशन मा. सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे साहेब यांच्या शुभहस्ते एका छोटेखानी समारंभात पुणे येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सार्थ कोकण या अंकाचे संपादक व असोसिएशनचे मा. उपाध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी असोसिएशनच्या पदाधिका-यांची, कामाची व सभासद बँकांची माहिती दिली. सार्थ कोकणच्या  ह्या अंकात कर्ज वसूली संदर्भातील निरनिराळे कायदे तसेच चर्चा व समुपदेशाने कर्ज वसूली या विषयांवरील लेखांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढील अंकही सहकारी बँकांना उपयुक्त असणा-या विशिष्ठ विषयांवर मार्गदर्शन करणारे असतील असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी मा. उपनिबंधक श्री. आनंद कटके साहेब, सहकार आयुक्त कार्यालयातील श्री. गेडाम साहेब तसेच अन्य मान्यवर अधिकारी / कर्मचारी व सार्थ कोकण या अंकाच्या संपादक मंडळाचे सदस्य तसेच डोंबिवली बँकेचे मा. संचालक श्री. मिलिंद आरोलकर तसेच डोंबिवली बँकेचे अधिकारी श्री. उदय पेंडसे उपस्थित होते. उपयुक्त माहितीने समृद्ध असलेले “सार्थ कोकण” आता सर्वदूर पोहोचावे यासाठी हा अंक ई-बुक स्वरुपात ही उपलब्ध असल्याची माहिती श्री. आरोलकर यांनी दिली.
मा. कवडे साहेबांनी असोसिएशनच्या कामाची प्रशंसा केली व असोसिएशनच्या सदस्य बँकांच्या प्रतिनिधीं बरोबर संवाद साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे मान्य केले.
मा. सहकार आयुक्तांना पुष्पगुच्छ व असोसिएशनचे मानचिन्ह देउन कार्यक्रमाची सांगता झाली.
Share this Story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *