करोंनाच्या प्रादुर्भावामुळे असोसिएशन गेली काही वर्षे बँक कर्चाऱ्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करु शकली नाही. असोसिएशनतर्फे “क्रिडा महोत्सव २०१८” दि. २६ ते २८ जानेवारी २०१८ या कालावधीत भरविण्यात आला होता. या स्पर्धा जिल्हास्तरीय तसेच आंतरजिल्हास्तरीय पातळीवर खेळल्या गेल्या. या स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी  बॅसीन कॅथॅालिक को. ऑप. बँक लि. यांनी महोत्सवाचे प्रायोजकत्व स्विकारले होते. सोयीच्या दृष्टीने क्रिडा स्पर्धा दोन झोनमध्ये विभागण्यात आल्या होत्या, झोन १ मध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील सदस्य बँकांतील कर्मचा-यांसाठी स्पर्धा झाल्या. तर झोन २ मध्ये उर्वरित रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य बँकांतील कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा झाल्या. दि. २६ व २७ जानेवारी २०१८ रोजी झोन १ च्या विभागीय स्पर्धा वसई येथे व झोन २ यांच्या विभागीय स्पर्धा चिपळूण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ११ वा क्रिडा महोत्सव संपन्न झाला. या स्पर्धेत ठाणे व पालघर जिल्ह्यातील १५ सदस्य बँकांपैकी १२ बँकांतील एकूण ५२५ कर्मचाऱ्यांनी भाग घेतला, तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ सदस्य बँकांपैकी ७ बँकांतील एकूण २५० कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. एकूण २७ पैकी १९ सदस्य बँकांनी स्पर्धेत भाग घेतला. सर्वांनी आपल्या अंगी असलेल्या क्रिडा नैपुण्याचे, कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

सदर स्पर्धेचे आयोजन करताना बॅसीन कॅथॅालिक को. ऑप. बँक लि. व चिपळूण अर्बन को. ऑप बँक लि. यांच्या मा. संचालक मंडळाचे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे तसेच, बँकांनी नेमून दिलेल्या क्रीडा प्रतिनिधीचे अनमोल सहकार्य मिळाले त्यामुळे सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या.

Share this Story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *